मर्मगंधातली ही एक भेट....
कोवळ्या या क्षणांची ती एक भेट....
पावसाळी ओलाव्याचा तो एक भास....
आरक्त डोळे पाहती फक्त तिचीच वाट......
मर्मगंधातली ही एक भेट....!!!
ऋतूंच्या स्पर्शाने बदलणारी ही एक भेट....
चंद्राच्या मंद प्रकाशी फुलणारी ती एक भेट....
कोरड्या मातीवर पडलेल्या डावाचा तो एक भास.....
केवड्याच्या बनातून जाई , रांजहनसाची वाट.....
मर्मगंधातली ही एक भेट....!!!
कवींच्या मनाला कल्पकतेची एक भेट....
शब्दांच्या संगतीला स्वररूपी एक भेट...
भावविश्वात रंगवलेला तो एक भास......
रेखाटलेल्या त्या चित्राला , रंगसंगतीची एक भेट.....