Thursday, 20 October 2011

राजकारण

" नमस्कार !!!!  माझा जन्म हा लोकांच्या सेवेसाठीच  झाला आहे  !!!!! " वाक्य ऐकलच असेल !!!! अहो प्रत्येक राजकीय नेत्यांच्या तोंडी ही असलीच साच्यातून काढलेली वाक्य ठासून भरलेली असतात.....प्रत्येक सामन्यांच्या  मनातील भावना हीच आहे.... तरी भीती ती आहेच....कोणाबद्दल भीती ? ? ?   कशाला ? ? ? ? उगीच नाही हो...उगीच अजिबात नाही...परिस्थितीच  आहे तशी...

परवा घरी पाहुणे आलेले ,  भाऊबहिण आलेले...आम्ही सगळे  आपापल्या व्यापात व्यस्त असल्याने  वरचेवर  भेटच  होत  नाही.....सगळी  so called "Young" मंडळी  बसलेली  आणि  अचानक  बोलता  बोलता " आपल्या सारख्या तरुणांनी राजकारणात कसा लक्ष घातला पाहिजे ,  राजकारण सुद्धा एक  " Carrier option "  म्हणून  विचार करण्याचा क्षेत्र  आहे....अशा आणि  राजकारण या विषयावर सतराशेसाठ चर्चा झाल्या....मग रात्री झोपताना  मनात  सहाजिकच तोच विषय घोळत राहिला... आणि  एवढ्यात एक विचार मनाला चाटून गेला........
                                
                                            " राजकारण म्हणजे काय ???? "

आपण शाळेत असल्या पासून शब्दांना विभक्त कस करायच हे शिकलोय...बहुदा कही शिक्षित राजकारणी  ते समाजात पण वापरतात... तर मी तेच करायच ठरवल....आणि राजकारण या शब्दाला विभक्त केल...."राज---कारण"... अशा प्रकारे शब्दाला विभक्त केल्यावर ध्यानात आल , अरे ही शब्दांची जोड़ी अनेक अर्थ सांगत आहे.....बघा ना...


पहिला ..... "राज - कारण"
                 म्हणजे राज्य करण्यासाठी लागणारे कारण किंवा राज्य सांभाळण्याचे कारण , जे सर्वच पक्ष सदानकदा  देत असतात.... 


दुसरा....."राज - कारण"
              म्हणजे लोकांच्याच कारणासाठी लोकांवर राज्य करणे..किंवा लोकांचीच कारणे दरवेळी नव्याने सजवून  लोकांपुढे मांडत राहून आपले खिसे गरम करत राज्य करणे......... 


तिसरा......" राज - का - रण " ( हा अर्थ जास्त ठळक पणे लक्षात राहिला...)
            लोकांच्या मनावर   ( चांगल्या अर्थाने  )   राज्य करायच  का   राज्य  करायच्या  नावाखाली लोकांमध्येच युद्ध  लावुन  द्यायच !!!!


बघाना माझ्या सारख्या सामान्याला राजकारण या केवळ शब्दाचा एवढा विचार करावा लागतोय...अणि दुसरीकडे आपल्या लोकाप्रतिनिधिन्ना  त्याचे  महत्वच  वाटताना  दिसत नाही.....हत्तीच्या दातासारखच  आश्वासने  देतानाचा सुर एक   आणि  निवडून आल्यावरचा  सुर भलताच.....लोकशाहीत एक प्रकारची दडपशाही  आणण्याच्या या प्रकाराला कधीतरी लगाम बसेल असा विचार आला...अणि एकदम झोप लागली.... 

Wednesday, 19 October 2011

व्याख्या(Definition)

"Definition" सर ,नाही येत...:(  कधीही कुठल्याही गोष्टीची Definition विचारा, तुमचे विषय,वस्तू बदलतील पण आमचं उत्तर एकच " येत नाही "....आपल्या आयुष्यात बरेचदा आपण आपल्या आयुष्याची Definition , ( असा काय करता कळत नाहीये का मराठीत सांगू का?? बर  तर "व्याख्या" ) विसरतो हो!!! हे नेहमी होतं..कितीही ठरवा...कोरून ठेवा..विसरणारच...माझ्यामते आपण हे असा विसरणार हि देखील एक लिहिलेली व्याख्याच असेल...जी man to man volatile असेल....अहो volatile म्हणजे always change होत असेल...

एक विचार करा Why we have व्याख्या in our life??? का असतात तरी का???बघाना प्रत्येक गोष्टीला व्याख्या , सकाळी उठण्यापासून ते breakfast ते जेवण ते अगदी रात्री Brush करून झोपे पर्यंत.....जरा उसंत नाही या व्याख्येतून..पण जरा एक confusion आहे कि Brush करायची व्याख्या time नुसार differentiate कशी करतात...तर व्याख्या....चालण्याची व्याख्या (Ramp Walk) , बोलण्याची व्याख्या (Voice culture) , जेवायची व्याख्या (table manners) , गर्दीत  vavartanachi व्याख्या (public relations)..नशीब जेव्हा पेनाने वहीवर लिहितो तेव्हा त्याची व्याख्या पेनाने अजून विचारली नाहीये...की आधी माझी "Definition" सांग आणि मगच मला हातात घे...
शाळेत गेल्यापासून जे धास्के प्रत्येकाच्या ठायी ठायी मुरवले जातात त्यापैकी एक म्हणजे  "व्याख्या"..शाळेत असताना जे गैरसमज असतात त्यापैकीही एक म्हणजे व्याख्या..व्याख्या या साधारण गणित आणि विज्ञानाच्या असतात हा भ्रम असतोच...तर तो कधी विरेल  आपला आपल्याला कळत नाही..कारण..शब्द कसे  लिहावेत  या  पासून  व्याख्यांना  सुरवात  होते ..आणि  राग  कसा  Control मध्ये  ठेऊन  express व्हायचं  याला  ही...एक  व्याख्या 
प्रत्येक माणूस मोठा होतो ..गर्दीत मिसळतो....अहो त्याला मिसळावाच लागतं.....समोर येणाऱ्या प्रत्येक व्याख्येला अनुभवाच्या शाळेत शिकलेली उत्तरे लिहावी लागतात..त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो...कारण आपल्या आयुष्याची व्याख्या विधात्याने लिहिलेली असते....जिला कुठलाही सिद्धांत वापरून त्या खुद्द विधात्यालाच बदलता येत नाही......