Thursday, 20 October 2011

राजकारण

" नमस्कार !!!!  माझा जन्म हा लोकांच्या सेवेसाठीच  झाला आहे  !!!!! " वाक्य ऐकलच असेल !!!! अहो प्रत्येक राजकीय नेत्यांच्या तोंडी ही असलीच साच्यातून काढलेली वाक्य ठासून भरलेली असतात.....प्रत्येक सामन्यांच्या  मनातील भावना हीच आहे.... तरी भीती ती आहेच....कोणाबद्दल भीती ? ? ?   कशाला ? ? ? ? उगीच नाही हो...उगीच अजिबात नाही...परिस्थितीच  आहे तशी...

परवा घरी पाहुणे आलेले ,  भाऊबहिण आलेले...आम्ही सगळे  आपापल्या व्यापात व्यस्त असल्याने  वरचेवर  भेटच  होत  नाही.....सगळी  so called "Young" मंडळी  बसलेली  आणि  अचानक  बोलता  बोलता " आपल्या सारख्या तरुणांनी राजकारणात कसा लक्ष घातला पाहिजे ,  राजकारण सुद्धा एक  " Carrier option "  म्हणून  विचार करण्याचा क्षेत्र  आहे....अशा आणि  राजकारण या विषयावर सतराशेसाठ चर्चा झाल्या....मग रात्री झोपताना  मनात  सहाजिकच तोच विषय घोळत राहिला... आणि  एवढ्यात एक विचार मनाला चाटून गेला........
                                
                                            " राजकारण म्हणजे काय ???? "

आपण शाळेत असल्या पासून शब्दांना विभक्त कस करायच हे शिकलोय...बहुदा कही शिक्षित राजकारणी  ते समाजात पण वापरतात... तर मी तेच करायच ठरवल....आणि राजकारण या शब्दाला विभक्त केल...."राज---कारण"... अशा प्रकारे शब्दाला विभक्त केल्यावर ध्यानात आल , अरे ही शब्दांची जोड़ी अनेक अर्थ सांगत आहे.....बघा ना...


पहिला ..... "राज - कारण"
                 म्हणजे राज्य करण्यासाठी लागणारे कारण किंवा राज्य सांभाळण्याचे कारण , जे सर्वच पक्ष सदानकदा  देत असतात.... 


दुसरा....."राज - कारण"
              म्हणजे लोकांच्याच कारणासाठी लोकांवर राज्य करणे..किंवा लोकांचीच कारणे दरवेळी नव्याने सजवून  लोकांपुढे मांडत राहून आपले खिसे गरम करत राज्य करणे......... 


तिसरा......" राज - का - रण " ( हा अर्थ जास्त ठळक पणे लक्षात राहिला...)
            लोकांच्या मनावर   ( चांगल्या अर्थाने  )   राज्य करायच  का   राज्य  करायच्या  नावाखाली लोकांमध्येच युद्ध  लावुन  द्यायच !!!!


बघाना माझ्या सारख्या सामान्याला राजकारण या केवळ शब्दाचा एवढा विचार करावा लागतोय...अणि दुसरीकडे आपल्या लोकाप्रतिनिधिन्ना  त्याचे  महत्वच  वाटताना  दिसत नाही.....हत्तीच्या दातासारखच  आश्वासने  देतानाचा सुर एक   आणि  निवडून आल्यावरचा  सुर भलताच.....लोकशाहीत एक प्रकारची दडपशाही  आणण्याच्या या प्रकाराला कधीतरी लगाम बसेल असा विचार आला...अणि एकदम झोप लागली.... 

3 comments:

  1. राजकारण की राज-का-रण . चांगला प्रश्न छेडला मनाने .
    परंतु हे राज कारणी लोक म्हणजे वेगळ्या ग्रहावरून आलेले भारतीय राजकीय सत्ता चालवण्याकरिता नेमलेले परग्रहवासी नव्हेत.ते आहेत(किंवा होते) याच जनमानसातले. प्रश्न आहे तो 'त्या सत्तेच्या स्थानावर पोहोचल्यावर येणार्‍या दांभिक आणि गाफिल वृत्तीचा बीमोड करण्याच्या जनतेत नसलेल्या गांभिर्याचा'. ज्यातुनच मग पुढे ही भ्रष्ट व्यवस्था प्रस्थापित होत आली आहे आणि होते .आणि बळकटही होते. ज्याला आपण सो कॉल्ड "सिस्टमच तशी आहे" असे नाइलाजास्तव म्हणतो . ती "corrupt" वगैरे आहे असे म्हणतो आणि राजकारण्याना शिव्या देतो. जिथे कंपनी मोठी करण्यासाठी मॅनेज्मेंट ची नितांत आवश्यकता असते तिथे आपला संपूर्ण देश चालवण्याच्या राजकारणा बाबतीत किती मॅनेज्मेंट ची आवश्यकता असेल. पण या बाबतीत आपण एक मतदान देऊन कोणाला तरी निवडू देण्याच्या एका औपचारिक उपक्रमा पलीकडे या बाबतीत उदासच दिसतो.
    मुख्य जबाबदारी आहे ती आपली.कारण आपल्याला गांभीर्य नसल्याने कालांतराने अशी ही भ्रष्टा व्यवस्था तयार होते. युवा पिढी शिकते दहावी होते बारावी होते मग आपल्या आवडीच्या विषयात पदवीधर; अन् मग जॉब्समागे आणि आपले करियर वगैरे वगैरे.या सर्वातून मग देशाच्या समाजकारणाचा आणि देशाच्या राजकारणाचा गांभिर्यात्मक विचार आपल्याला(काहीजणाचे अपवाद वगळता) किती वेळा येतो आणि आल्यास किती वेळ टिकतो?? विचार येतो तो फक्त असेच सगळे एकत्र जमले की थोडा विरंगुळ्याचा एक विषय म्हणून.
    हे सर्व बदलण्यासाठी गरज आहे ती हे 'गांभीर्य' शालेय जीवनापासून बालमनात रुजवण्याची(नुसता नागरिक शास्त्र/CIVICS असे विषय अंतर्भूत करण्यापेक्षा जास्ता काहीतरी).मग अगदी त्या बालमनाच्या अवस्थेपासून मनाची घडणच 'एक जबाबदार नागरिक आणि आपली त्याप्रती असलेली कर्तव्य' याच्या मूलभूत जाणिवेसाहित होईल. आणि मग असे 'मन'हे इतक्‍या हलक्या दर्जाच्या भ्रष्ट-राजकारणाच्या डोहात उतरण्यात सार्थकता मानण्यास सहजा सहजी तयार न होता सत्-सत्-विवेक बुद्धीने दहावेळा विचार करेल. आणि स्वता:ला त्यातून परावृत्त करेल.

    ReplyDelete
  2. "carrier option"???
    DID U MEAN "CAREER"?

    ReplyDelete