" नमस्कार !!!! माझा जन्म हा लोकांच्या सेवेसाठीच झाला आहे !!!!! " वाक्य ऐकलच असेल !!!! अहो प्रत्येक राजकीय नेत्यांच्या तोंडी ही असलीच साच्यातून काढलेली वाक्य ठासून भरलेली असतात.....प्रत्येक सामन्यांच्या मनातील भावना हीच आहे.... तरी भीती ती आहेच....कोणाबद्दल भीती ? ? ? कशाला ? ? ? ? उगीच नाही हो...उगीच अजिबात नाही...परिस्थितीच आहे तशी...
परवा घरी पाहुणे आलेले , भाऊबहिण आलेले...आम्ही सगळे आपापल्या व्यापात व्यस्त असल्याने वरचेवर भेटच होत नाही.....सगळी so called "Young" मंडळी बसलेली आणि अचानक बोलता बोलता " आपल्या सारख्या तरुणांनी राजकारणात कसा लक्ष घातला पाहिजे , राजकारण सुद्धा एक " Carrier option " म्हणून विचार करण्याचा क्षेत्र आहे....अशा आणि राजकारण या विषयावर सतराशेसाठ चर्चा झाल्या....मग रात्री झोपताना मनात सहाजिकच तोच विषय घोळत राहिला... आणि एवढ्यात एक विचार मनाला चाटून गेला........
" राजकारण म्हणजे काय ???? "
आपण शाळेत असल्या पासून शब्दांना विभक्त कस करायच हे शिकलोय...बहुदा कही शिक्षित राजकारणी ते समाजात पण वापरतात... तर मी तेच करायच ठरवल....आणि राजकारण या शब्दाला विभक्त केल...."राज---कारण"... अशा प्रकारे शब्दाला विभक्त केल्यावर ध्यानात आल , अरे ही शब्दांची जोड़ी अनेक अर्थ सांगत आहे.....बघा ना...
पहिला ..... "राज - कारण"
म्हणजे राज्य करण्यासाठी लागणारे कारण किंवा राज्य सांभाळण्याचे कारण , जे सर्वच पक्ष सदानकदा देत असतात....
दुसरा....."राज - कारण"
म्हणजे लोकांच्याच कारणासाठी लोकांवर राज्य करणे..किंवा लोकांचीच कारणे दरवेळी नव्याने सजवून लोकांपुढे मांडत राहून आपले खिसे गरम करत राज्य करणे.........
तिसरा......" राज - का - रण " ( हा अर्थ जास्त ठळक पणे लक्षात राहिला...)
लोकांच्या मनावर ( चांगल्या अर्थाने ) राज्य करायच का राज्य करायच्या नावाखाली लोकांमध्येच युद्ध लावुन द्यायच !!!!
बघाना माझ्या सारख्या सामान्याला राजकारण या केवळ शब्दाचा एवढा विचार करावा लागतोय...अणि दुसरीकडे आपल्या लोकाप्रतिनिधिन्ना त्याचे महत्वच वाटताना दिसत नाही.....हत्तीच्या दातासारखच आश्वासने देतानाचा सुर एक आणि निवडून आल्यावरचा सुर भलताच.....लोकशाहीत एक प्रकारची दडपशाही आणण्याच्या या प्रकाराला कधीतरी लगाम बसेल असा विचार आला...अणि एकदम झोप लागली....